Breaking News

आष्टी नगरपंचायतची निवडणूक मनसे स्वबळावर लढणार - जिल्हा अध्यक्ष कैलास दरेकर


के. के. निकाळजे । आष्टी 

आष्टी नगपंचात निवडणूक लढवणार असल्याचे मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.पुढे असे म्हटले आहे की राज्यातील राज्य उपाध्यक्ष यांच्या घेतलेल्या बैठकीत मा.राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मनसेचे उमेदवार देण्याचे आदेश आल्याचे मा.राज्य उपाध्यक्ष अशोक भाऊ तावरे यांनी बैठकीत बोलताना सांगितले.

आष्टी नगरपंचात मध्ये सातत्याने झालेल्या भ्रष्टाचार कामात अनियमितता शहरातील ज्वलत प्रश्न वर्ष न वर्षी प्रलबिंत ठेवल्याने तसेच मनसे ३१मुद्याचां वचननामा घेऊन जनतेत जाणार असल्याचे आष्टीशहराच्या मा.अशोक भाऊ तावरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सांगण्यात आले यावेळी बीड जिल्हा अध्यक्ष वैभव काकडे, मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर,संपत सायकड, शहर अध्यक्ष महेश अनारसे, भाऊ मेटे ,रवि माने,पराग बेदरे, किशोर डोमकावळे,राजू सय्यद आदी शहरातील मनसैनिक उपस्थित होते.


No comments