Breaking News

दारू बंदीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल केला नष्ट

गौतम बचुटे । केज 

अनेक वर्षांपासून आष्टी पोलीस स्टेशनला दारू बंदीच्या गुन्ह्यातील जप्त केलेला मुद्देमाल पोलीस अधीक्षक आर राजास्वामी यांच्या आदेशाने नष्ट करण्यात आला.


या बाबतची माहिती अशी की, सन २०१४ पासून आष्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विविध ठिकाणी १ हजार रु. पेक्षा जास्त किंमतीचा १३३ वेगवेगळ्या गुन्ह्यातील जप्त केलेला देशी व विदेशी बनावटीच्या मुद्देमाल हा आष्टी पोलिसांच्या ताब्यात होता. सदर मुद्देमाल हा ज्या गुन्ह्यात जप्त आहे; त्याचे न्यायालयाच्या समरी हस्तगत करून मा. न्यायालयाच्या आदेशानुसार हा मुद्देमाल नष्ट करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना पत्राद्वारे कळविण्यात आले. या बाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आदेश प्राप्त होताच दि.२२ डिसेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी हा सर्व मुद्देमाल कडा दुरक्षेत्रातील रिकाम्या जागेत नेऊन तो पंचासमक्ष नष्ट केला. या प्रसंगी आष्टी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सलीम चाऊस तसेच  पोलीस नाईक केदार व त्यांचे सहकारी अडागळे यांनी वरिष्ठांनी दिलेल्या आदेशा प्रमाणे योग्य ती तजविज ठेऊन मुद्देमाल नष्ट केला.




No comments