Breaking News

सोयाबीनचे बियाणे देण्याच्या बहाण्याने पुण्याच्या कंपनीने व्यापाऱ्यांना चार लाख पंचाऐंशी हजार रुपयेला गंडविले !


चार लाख पंच्याऐंशी हजार रुपयाला गंडा घालणारे पुण्याचे ठक पोलीसांना देताहेत चकवा !

गौतम बचुटे । केज  

सोयाबीनचे बियाणे पुरवठा करण्याच्या नावाखाली केज तालुक्यातील पाच दुकानदारांना चार लाख पंचाऐंशी हजार रु. चा गंडा घालणारे पुण्याच्या कंपनीचे ठक पोलिसांना चकवा देत आहेत.

सन २०१७ या वर्षात केज तालुक्यातील अनिल सुर्यवंशी पिसेगाव, विकास देशमुख विडा, अतुल आगे काळेगाव घाट, बाबासाहेब राऊत कानडी माळी आणि अतुल नाईकनवरे केज या पाच व्यापाऱ्यांकडे ज्ञानेश्वर राख होळ व रंगनाथ चाळक लव्हुरी या बी-बियाण्यांची मार्केटींक करणाऱ्या सेल्समन यांनी ग्रीन लीफ ॲग्रो मार्केटिंग सोल्युशस प्रा. लि. पुणे यांचे सोयाबीनचे बियाणे विक्रिसाठी असल्याची माहिती दिली. 

सदर बियाण्याच्या बुकिंगसाठी या पाच विक्रेत्यांनी नगदी पैशाच्या स्वरूपात, चेकद्वारे आणि आरटीजीएसद्वारे एकूण चार लाख पचाऐंशी हजार रु. अदा केले. परंतु ग्रीन लीफ ॲग्रो मार्केटिंग सोल्युशस प्रा. लि.  याांनी त्यांना बियाणे दिले नाही. त्यानंतर सदर व्यापाऱ्यांनी पुणे येथे जाऊन कंपनीच्या पत्त्यावर शोध घेतला असता कंपनी बंद करून संचालकांनी पोबारा केल्याचे निदर्शनास आले. 


त्या नंतर सन २०१८ रोजी त्यांनी कंपनीच्या संचालकांचे शोध घेऊन त्यांना अहमदनगर येथे त्यांच्या निवासस्थानी भेटून त्यांनी जमा करून घेतलेले पैसे वापस देण्याची मागणी केली. त्यामुळे कंपनीचे संचालक संतोषकुमार वेताळ याची पत्नी सुजाता वेताळ, त्याची बहीण दिपाली वेताळ यांनी त्यांना ॲक्सिस बँकेचे बियाणे विक्रेत्यांना त्यांच्या जमा असलेल्या रक्कमेचे धनादेश दिलेे. परंतु सदर धनादेश हे वटले नाहीत. सर्वांची फसवणूक झाली असल्याचे निदर्शनास येेेताच; ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी दि. २२ जानेवारी २०१९ रोजी केज पोलीस स्टेशन येथे कंपनी व त्यांच्या संचालक आशिष वेताळ, संतोषकुमार वेताळ, सुरेश शेटे, सुजाता वेताळ व दिपाली वेताळ या पाच जणांच्या विरुद्ध पैसे घेऊन बियाणे न देता फसवणूक केल्या प्रकरणी गु. र. नं. ३०/२०१९ भा. दं. वि. ४२०, ४०९ व ३४ गुन्हा दाखल करण्यात आला. 

याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब कांबळे व त्या नंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे करीत आहेत. परंतु सदर गुन्ह्याच्या संदर्भात तपास करीत असताना गुन्हेगार हे चाणाक्ष आणि पोलीस स्टेशनच्या व जिल्ह्याबाहेर हद्दीत असल्याने ते वारंवार त्यांचे राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने ते पोलीसांच्या हाती लागत नाहीत.No comments