Breaking News

सोमवारी माजलगाव तालुक्यातील ९१ ग्रामपंचायत सरपंच पद आरक्षणाची सोडतसंतोष स्वामी । दिंद्रुड 

माजलगाव तालुक्यातील 91 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून सरपंच पदाचे आरक्षण सोडत सोमवार दि .७ डिसेंबर 2020 रोजी माजलगाव तहसील कार्यालयात दुपारी 3 वा. होणार असल्याची माहिती तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिली आहे.

या बाबत प्राप्त माहिती अशी की, माजलगाव तालुक्यात ९१ ग्रामपंचायतींच्या सन २०२० ते २०२५ या पाच वर्षासाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत करण्यात येणार आहे.

 यात प्रवर्ग निहाय आरक्षित जागा पुढीलप्रमाणे

1)अनुसूचित जाती सरपंच पदासाठी आरक्षित पदे १५ असून यात महिला ७ तर पुरुष ८,  2)अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित पद ०१,  यात महिला ०१, 3)नागरिकाचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित पदे 24 असून यात महिला १२ तर पुरुष १२,  4)खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित पदे ५१ असून महिला २५ व पुरुष २६ जागा आहेत. या पद्धतीने तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत होणार आहे. 

जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने सोमवारी दि. ७ रोजी दुपारी 3 वाजता माजलगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात हा सोडतीचा कार्यक्रम उपविभागीय अधिकारी माजलगाव एस.एस.गायकवाड व माजलगाव तहसीलदार वैशाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीचे गांभीर्य ओळखून तोंडावर मास्क, सॅनिटायझर अन् फिजिकल डिस्टन्स ठेऊन नागरिकांनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन तहसीलदार श्रीमती वैशाली पाटील यांनी केले आहे.


No comments