Breaking News

शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू : साळेगाव येथील दुर्देवी घटना


गौतम बचुटे । केज  

केज तालुक्यातील साळेगाव येथील एका २८ वर्षीय तरूण शेतकऱ्यांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे.


 

या बाबतची माहिती अशी की, साळेगाव ता. केज येथील रमेश आश्रूबा गित्ते हा २८ वर्षाचा तरुण शेतकरी हा दि.१५ डिसेंबर रोजी रात्री आपल्या शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेला होता. मोटार सुरू करायला जात असताना विहिरीत पाय घसरून पडला व त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. नंतर दि. १६ डिसेंबर रोजी सकाळी त्याचे वडील नित्यनियमा प्रमाणे शेतात गेले असता त्यांना विहीरी जवळ रमेशची मोटार सायकल आढळून आली व विहिरीच्या काठावर रमेशच्या पायातील एक चप्पल आढळून आली. तो घरी आला नाही म्हणून त्यानी त्याच्या मोबाईलवर फोन केला असता मोबाईल बंद होता. त्यामुळे त्यांना संशय आल्याने त्यांनी नातेवाईकांना माहिती दिली. त्या नंतर उपस्थित नागरिकांनी विहिरीत बोरीच्या काटेरी फांद्या टाकून शोध घेतला असता त्याचे प्रेत आढळून आले. 

या प्रकरणी माहिती मिळताच पोलीस नाईक अमोल गायकवाड, अशोक गवळी व वैभव राऊत हे घटनास्थळी हजर झाले. मयत रमेशच्या वडिलांच्या खबरी वरून केज पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत रमेश याच्या पश्चात आईवडील, पत्नी, चार वर्षाचा मुलगा व दोन वर्षाची मुलगी आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक अमोल गायकवाड आणि अशोक गवळी हे करीत आहेत.

No comments