Breaking News

ओबीसींच्या अस्तित्वासाठी ओबीसी आरक्षण बचाव मोर्चात सहभागी व्हा : दत्ताभाऊ बोडखे


के. के. निकाळजे । आष्टी

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून ओबीसी समाजाचा दिलेले हक्काचे आरक्षण फक्त ओबीसी समाजाचेच आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमचा पाठिंबाच आहे परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये याची खबरदारी शासनाने  घ्यावी असे प्रतिपादन अ. भा.म.फुले समता परिषदेचे आष्टी तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ बोडखे यांनी केले आहे.

         

मंगळवार दि. ८ डिसेंबर रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा निघणार आहे. या मोर्चाच्या पूर्वतयारी संदर्भात जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ओबीसी समाजबांधवांची बैठक समता परिषदेचे विभागीय तथा बीड जिल्हाध्यक्ष अॅड.सुभाष राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. महाराष्ट्रात ओबीसींचा मंडल आयोग १९९४ साली लागु होवुनही २५  वर्षानंतरही ओबीसींच्या समस्या कायमच नाही तर त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे.ओबीसी विद्यार्थ्यांची तीन हजार कोटीची थकित शिष्यवृत्ती, ओबीसी विद्यार्थ्यांची वसतीगृहे, स्वाधार योजना,महाज्योतीला हजारो कोटीचा निधी हे विषय ऐरणीवर असतांना आता काही लोकांनी ओबीसींचे आरक्षणच धोक्यात आणण्याचे कटकारस्थान सुरू केले आहे त्यासाठी महाराष्ट्रात ओबीसी जनजागृती करून सरकारला ईशारा देण्यासाठी महाराष्ट्रभर समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते ना. छगनराव भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली म. फुले समता परीषदेच्यावतीने ओबीसी आरक्षण बचाव मोर्चे निघत आहेत. 

त्याचा भाग म्हणुन म.फुले समता परिषद आणि विविध ओबीसी संघटनांच्यावतीने मंगळवार दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स,म. फुले पुतळा येथून बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा निघणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीला आमचा पूर्णतः पाठिंबा आहे मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशारा म.फुले समता परिषद आष्टीचे तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ बोडखे यांनी दिला आहे.


No comments