Breaking News

गाव तिथे राष्ट्रीय वारकरी परिषदेची शाखा व कार्यकारणीस प्रतिसादशिरुर कासार :  नुकतीच सिद्धेश्वर संस्थान वर घेण्यात आलेल्या बैठकीत एक इच्छा प्रकट केली असताना शिरूर कासार तालुक्यातील जवळपास अनेक गावातून प्रतिसाद मिळत असून राष्ट्रीय वारकरी परिषद शाखा स्थापनेसाठी अनेकांचा प्रतिसाद अनुकूल असून लवकरच आम्ही तालुक्यातून अनेक ठिकाणी या शाखेचे उद्घाटन करणार असल्याचे बीड जिल्हा अध्यक्ष हरिभक्त परायण संभाजी महाराज खेडकर यांनी स्पष्ट केले आहे नुकतीच शिरूर कासार तालुक्‍यातील लोणी आणि खांबा लिंबा येथे शाखेचे उद्घाटन करण्यात आले आहे या ठिकाणी सर्व सदस्य मंडळींनी उपस्थित राहून या कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

शिरूर कासार तालुक्याची जबाबदारी ह भ प संतोष महाराज मिसाळ यांच्यावर सोपवल्या पासून तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याने उपाध्यक्ष राम क्षीरसागर,जीवन महानुभाव,भाऊसाहेब हरिदास, आधी सर्व सदस्यांचे योगदान लाभत आहे याचाच प्रत्यय म्हणून तालुक्यातील लोणी येथील व खांबा लिंबा येथे राष्ट्रीय वारकरी परिषदेत ची शाखा स्थापन करण्यात आली याप्रसंगी गावातील व तालुक्यातील अनेक सदस्य उपस्थित होते ह भ प संभाजी महाराज खेडकर यांनी राबविलेल्या वारकरी परिषदेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी बीड जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ह-भ-प संभाजी महाराज यांना सहकार्यासाठी शिरूर कासार तालुक्याचे राष्ट्रीय वारकरी परिषदेचे तालुकाध्यक्ष ह भ प संतोष महाराज मिसाळ मिसाळ ढोकवड व त्यांचे सर्व सहकारी सातत्याने सहकार्य करीत आहेत पुढील काळातही गाव तेथे वारकरी परिषदेची शाखा निर्माण करण्याचा संकल्प केला आहे.No comments