Breaking News

माजलगावात जुगार आड्यासह हातभट्टी ठेक्यावर पोलिसांचे छापे

 बाळासाहेब आडागळे । माजलगाव 

माजलगाव शहर पोलिसांनी शहरातील अवैध धंद्यावाल्यां विरोधात कंबर कसली आहे. शनिवारी संध्याकाळी शहरातील जुना मोंढा भागात जुगार अड्ड्यावर तर गौतम नगर,चिंचगव्हाण भागातील हातभट्टी ठेक्यांवर छापे टाकले आहेत. या कार्यवाहीत पंधरा आरोपींविरोधात शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहरातील जुना मोंढा भागात नगरपरिषदेच्या रिकाम्या कॉम्प्लेक्समध्ये गेल्या अनेक दिवसापासून जुगार खेळला जात असल्याच्या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह  शनिवार दिनांक 12 रोजी संध्याकाळी या ठिकाणी छापे मारले. यावेळी 12 जन याठिकाणी रम्मी सोरट नावाचा जुगार खेळताना आढळून आले.दरम्यान यावेळी पोलिसांनी 15 हजार 900 रुपये नगदी सह बावीस हजार रुपयाचे 4 मोबाइल असा एकूण 37 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड यांनी आपल्या सहकार्‍यांसह शहरातील गौतम नगर भागातील तीन ठिकाणी हातभट्टी दारूच्या गुत्त्यावर छापे टाकून 23 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.चिंचगव्हाण येथील कारवाईतून सात हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. 

दरम्यान सपोनि अविनाश राठोड यांच्या फिर्यादीवरून जुगार खेळणारे साळीकगराम संपतराव शेवाळे, सत्यपाल बाबुराव मिसाळ, प्रकाश दत्तात्रय सावंत, शेख बबलू शेख दीलावर, शेख मेहबूब शेख यासीन, गुलाब खान वजीर खान, शेख ताहेर शेख गपुर, शेख रियाज शेख बबन, सोन्या उर्फ केदारनाथ नागुराव दराडे, शेख रफिक शेख रशीद, दत्तात्रय विठ्ठल शिंदे, अमोल लिंबाजी दाभाडे, या बारा जना विरोधात महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 4,5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या 3 महिलांसह निलेश बाबुराव मेंडके या चौघांनी विरोधात मुंबई दारू बंदी अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही कार्यवाया पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अविनाश राठोड सपोनि नीता गायकवाड, api सुभाष शेटे, पोना.गणेश तळेकर पोना.भास्कर राऊत, पोना डावकर, पोसि वसंत करे, पोहा अंकुशे, ठेगळे गणेश, यांनी ही कारवाई पार पाडली.No comments