Breaking News

मोठेवाडी शिवारातील विहीरीत अज्ञात तरुणाचा आढळला मृतदेह


माजलगाव पोलिसांची घटनास्थळी धाव

बाळासाहेब आडागळे । गंगामसला 

माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी शिवारात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सोमवारी सकाळी दहा वाजता आढळून आला. या व्यक्तीची ओळख अद्याप पटली नसून पोलिसांकडून शोध सुरू आहे.

 तालुक्यातील छोटेवाडी ते मोठेवाडी रोडच्या पश्चिम दिशेला सुरेश बागल यांच्या शेतातील विहीरीत ३५ ते ३८ वर्षे वयाच्या अनोळखी व्यक्तीचे प्रेत दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर माजलगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी मोठेवाडी व छोटेवाडी येथील नागरिकांच्या मदतीने विहीरीतुन प्रेत बाहेर काढले. 

या व्यक्तीच्या अंगात भगव्या रंगाचा शर्ट,जिन्नस पॅन्ट,काळ्या रंगाचे स्वेटर व खिशात महिंद्रा टॅकटरची चावी आढळून आली.पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी माजलगाव ग्रामीण रूग्णालयात पाठवले. शिवविच्छेदन केल्यानंतर नगर पालिकेने अंत्यविधी केला. ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. आर. विदाटे, बीट अंमलदार ए. एस. देशमुख, हेड कॉन्स्टेबल व्ही.एम.राठोड करत आहेत.


No comments