केज तहसिलची वाळू चोरी विरुद्ध धडक कार्यवाही
![]() |
प्रतिकात्मक |
गौतम बचुटे । केज
महसूल विभागाने मांजरा पट्ट्यातील वाळू चोरा विरुद्ध कार्यवाही केली असून वाळू चोरी प्रकरणी पोलीसात तक्रार केली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तहसीलचे कर्मचारी हे मांजरा पट्ट्यातील अवैद्य वाळू चोरी रोखण्यासाठी मंडळ अधिकारी भागवत पवार, तलाठी किसन देशमुख व माणिक पवार हे सरकारी वाहनांची गस्ती पथक गस्त घालीत असताना त्यांना मांजरा नदी पात्रात इस्थळ व सौंदना शिवारात एक विना नंबर प्लेटच्या ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये चार पुरुष व एक महिला हे वाळू भरीत असताना आढळून आले. गस्ती पथक दृष्टीस पडताच वाळू खाली टाकून ते पळून जाण्याचा यशस्वी झाले. दरम्यान मंडळ अधिकारी तथा पथक प्रमुख भागवत पवार, तलाठी किसन देशमुख व माणिक पवार व वाहन चालक गणेश डबरे यांनी वाळू व साहित्य जप्त करून सदर वाळू उपसा प्रकरणी तपास करून माहिती घेतली असता सदरील अनाधिकृत वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर हे ईस्थळ येथील विकास विठ्ठल कांबळे यांच्या मालकीचे असल्याचे समजले. त्या नुसार मंडळ अधिकारी भागवत पवार यांनी युसुफवडगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी नुसार गु. र. नं .२५३/२०२० भा. दं. वि. ४७९, ४८(७), ४८ (८) गुन्हा दाखल झाला असुन सहाय्यक पोलीस निरीक्षक आंनद झोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग वारे हे पुढील तपास करीत आहेत.
No comments