Breaking News

'मंत्री' ची चवच न्यारी..!

आमदार धस यांनी घेतला वडापावचा स्वाद 

शेख कासम । कडा 

आष्टी शहरातील फेमस वडापाव कुणाचा तर तो मंञी हॉटेलचा....मंत्रीच्या वडापावची चवच न्यारी अशी चर्चा खवय्यांमध्ये शहरात होत आहे. वडापावचा खमंग दरवळणाऱ्या सुगंधाने आमदार सुरेश धस यांनाही आकर्षित केलं. थेट आपल्या कार्यकर्त्यांसह आमदार धस यांनी मंत्रीच्या वडापावचा स्वाद घेतला. 

अल्पावधीतच आष्टीतील खवय्यांना मंत्री हॉटेलच्या वडापावने भुरळ घातली आहे. हाॕटेलसमोरुन ये- जा करणाऱ्या आष्टीकरांना गरमा गरम तळल्या जाणाऱ्या खमंग वडापावच्या सुगंधाच्या घमघमाटाने  अनेकांना वडापाव खाण्याचा मोह आवरत नाही असंच काही चित्र मंत्री हॉटेलमध्ये दिसत आहे. 

विशेष म्हणजे आमदार धस यांना वडापाव तर खूप आवडतो. इतरांप्रमाणे आमदार धस यांनाही मंत्रीच्या वडापावच्या सुगंधाने आकर्षित केलं. आमदार धस यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह वडापावचा स्वाद घेतला. आमदार धस यांचा सरळ आणी साधेपणा सर्व सामान्यांमध्ये मिसळून लोंकाचे प्रश्न जानून घेणाऱ्या या नेत्याची चर्चा आष्टीत होत आहे.  

No comments