Breaking News

आष्टी पोलीस स्टेशन हद्यीतील चार घरफोडया उघडकीस : एक आरोपी अटक

गौतम बचुटे । केज  

मागील दोन ते तीन महिण्याच्या काळात बीड जिल्हयात व बीड शहरात मोठया प्रमाणावर मालमत्तेचे गुन्हे घडले असून ते उघडकीस आणण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक, बीड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व त्यांचे अधिपत्याखालील अधिकारी यांना गुन्हेगार निष्पन्न करुन गुन्हे उघडकीस आणणे बाबत सक्त सुचना दिल्या आहेत. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक यांनी त्यांचे अधिपत्याखालील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे पथके तयार करुन रवाना केली. स्थागुशाचे पथक आष्टी भागात गुन्हेगारांचा शोध घेत असताना खात्रीलायक माहिती मिळाली की, कानिफनाथ ऊर्फ कान्हया उध्दव काळे रा. वाकी ता. आष्टी याने व त्याचे साथीदार यांनी मौजे शेरी, सांगवी आष्टी येथील घरफोडया केल्या आहेत. तो सध्या त्याचे राहत्या घराचे पाठीमागे झाडाखाली बसलेला आहे. अशी माहिती मिळाले वरुन पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली पथकाने माहिती काढून सापळा लावला. 

दि. 02 डिसेंबर 2020 रोजी एका इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव ,गाव विचारता याने त्याचे नाव कानिफनाथ ऊर्फ कान्हया उध्दव काळे रा. वाकी असे सांगीतले. त्यास गुन्हया बाबत विचारपुस करता त्याने त्याचे इतर दोन साथीदारांसह शेरी ( बु ), सांगवी आष्टी, धानोरा, अंभोरा येथे चोऱ्या केल्याचे कबुल केले. पोलीस स्टेशनचे अभिलेख पाहता पोलीस स्टेशन आष्टी येथे गु.र.नं. 122/2020 , 137/2020 कलम 457,380 भा.दं.वि. प्रमाणे तसेच पोलीस स्टेशन अंभोरा येथे गु.र.नं. 211/2020 , 217/2020 कलम 457,380 भा.दं.वि. चे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली . सदर आरोपीला गुन्हयाचे पुढील तपासकामी पोलीस स्टेशन आष्टी गु.र.नं. 122/2020 कलम 457, 380 भा.दं.वि.चे गुन्हयात दि. 02/12/2020 रोजी पोलीस स्टेशन, आष्टी येथे हजर केले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास आष्टी पोलीस हे करीत आहेत. गुन्हयातील चोरी गेलेला मुद्येमाल व इतर आरोपी शोध संदर्भाने तपास चालू आहे.


No comments