अंबड तालुक्यात झालेल्या ठिबकसिंचनच्या कामाची चौकशी करा - रामेश्वर खरात
अशोक खरात । अंबड
तालुक्यात झालेल्या ठिबकसिंचनची सखोल चौकशी करावी यासंदर्भातची मागणी युवा मल्हार सेनेचे रामेश्वर खरात यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांना पत्राद्वारे केली आहे.
भारत देश हा कृषिप्रधान देश आहे देशाची अर्थव्यवस्था कृषी व्यापारावर अवलंबून आहे त्यामुळे शेतकरी सुधारला पाहिजे शेतीची उन्नती झाली पाहिजे या विचाराने कुठल्याही पक्षाचा सरकार आ येवो परंतु शेतीसाठी व शेतकऱ्यांसाठी सतत नवनवीन योजना आणून देश सुखी व समृद्ध करण्याचा विचार सरकारच्या धोरणांमध्ये असतो परंतु केंद्र सरकारने राज्य सरकारने घोषित केलेले योजना खरंच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात का पोहोचल्या तरी त्या योजनांचा प्रवास शेतकऱ्यांना किती खडतर होतो प्रत्येक विभागातील कर्मचारी अधिकारी शेतकऱ्यांची किती प्रमाणात पिळवणूक करतात हे आपणा सर्वांना माहीत आहे.
अंबड तालुक्यात मागील पाच वर्षांपासून ठिबकसिंचन मध्ये फार मोठ्या प्रमाणात अनियमितता झालेली आहे एखाद्या शेतकऱ्याने एक एकर ठिबक केले व त्याचा सातबारा एकर पेक्षा जास्त असेल तर बाकी जमिनीवर शेतकऱ्याला न सांगता सबसिडी काढण्यात आल्याचा आरोप खरात यांनी निवेदनात केला असून काही प्रकरणात सातबारा एकाच्या नावाचा व जिओ टॅगिंग दुसऱ्याच्या च शेतात तसेच ठिबकची नळी फिल्टर वाल पीव्हीसी पाईप व ईतर मटेरियल आय एस आय नामांकित कंपनीची न वापरता नॉन आय एस आय वापरण्यात आली आहे असंही त्यांनी त्या नमूद केलं आहे. याचसंदर्भात चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी अशी मागणी युवा मल्हार सेनेचे रामेश्वर खरात यांनी केली आहे.
No comments