Breaking News

केज तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत सात अर्ज दाखल


गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील २३ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी एका गावातील सात उमेदवारांनी अर्ज सादर केले असून इतर बावीस गावातून मात्र अद्याप एकही अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती आहे.


या बाबतची माहिती अशी की, दि. १५ जानेवारी रोजी केज तालुक्यातील ११४ ग्रामपंचायती पैकी वाघेबाभूळगाव, मुंडेवाडी, नारेवाडी, विडा, आंधळेवाडी, कोरडेवाडी, शिंदी, येवता, काशीदवाडी, सुकळी, मोटेगाव, पैठण, बाणेगाव, दरडवाडी, धोतरा, घाटेवाडी, गप्पेवाडी, बोबडेवाडी, लाखा, भोपला, पाथरा, रामेश्वरवाडी आणि जाधव जवळा या गावात २३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक होत आहेत. दि .२३ डिसेंबर पासून दि. ३० डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्राची विक्री व स्वीकृती करण्यात येणार आहे. दरम्यान दि २४ डिसेंबर रोजी दुसऱ्या दिवशी या गावांपैैकी नारेवाडी येथील सात नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले आहेत. त्या पैकी चार महिला व तीन पुरुष उमेदवार आहेत.
No comments