उद्याच्या भारत बंद मध्ये सामील व्हा - बाबुराव पोटभरे
बाळासाहेब आडागळे । माजलगाव
केंद्र सरकारने जाचक अटी लावत शेतकऱ्यांच्या विरोधात कायदा केला. दिल्ली येथे चाललेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणुन भारत बंद मध्ये जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी सामील व्हावे असे आवाहन बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक बाबुराव पोटभरे यांनी केले आहे.
केंद्र सरकारने काही महिण्यापुर्वी शेतकऱ्यांच्या विरोधात असलेला शेतकरी विधेयक कायदा संमत केला असुन हा कायदा शेतकऱ्यांच्या विरोधात असल्यामुळे शेतकऱ्यांचे यात मोठे नुकसान तर होणार असुन सर्वसामान्य ,दुबळ्या समाजाच्या दैनंदिन जीवनात याचा परिणाम होणार आहे. केंद्र सरकारच्या विरोधात दिल्ली येथे मागील अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. याची सरकार दखल घेत नसल्याने मंगळवारी शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे.या आंदोलनात शेतकरी , व्यापारी व इतर सर्व स्थरातील नागरिकांनी सामील होऊन हा कायदा रद्द करण्यास भाग पाडावे असे आवाहन बाबुराव पोटभरे यांनी केले आहे.
No comments