Breaking News

राजकीय षडयंत्रापोटी महेबूब शेख यांना अडकवण्याचा प्रयत्न - प्रदिप सरवदे


शिरूर (कासार) : औरंगाबाद पोलिस ठाणे येथे काही दिवसांपूर्वी एका महिलेकडून महेबूब शेख या नावाचा उल्लेख असलेली तक्रार दाखल करण्यात आली.

ही व्यक्ती कोण याचा तपास लागण्याआधीच तक्रारीत नाव घेण्यात आलेली व्यक्ती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख हेच आहेत, असा दावा भाजपा नेत्यांनी केलाय. भाजपाकडून केवळ राजकीय षडयंत्रापोटी हा दावा करण्यात आला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(युवा नेते) प्रदिप सरवदे यांनी केले आहे.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी तक्रारीतील आरोप फेटाळून लावले आहेत. सामान्य घरातील व्यक्तीचे राजकीय आयुष्य अशाप्रकारे उद्ध्वस्त करू नये, दोषी असल्यास मिळेल त्या शिक्षेला सामोरे जाईन, असे त्यांनी माध्यमांसमोर सांगितले आहे.
No comments