माजलगावात कडकडीत बंद; ग्रामीण भागातही प्रचंड प्रतिसाद
बाळासाहेब आडागळे । माजलगाव
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारत बंदची हाक डाव्या विचारांच्या पक्ष संघटनांनी व पुरोगामी पक्ष संघटनांनी दिलेली असून या भारत बंदच्या आव्हानाला माजलगाव तालुक्यातील शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मानवी हक्क अभियान, मौलाना अब्दुल कलाम आझाद संघटना, शेतमजूर संघर्ष समिती आदी संघटनांनी सहभाग नोंदवला.
दिल्ली आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसांपूर्वीच अनेक विविध पक्ष संघटनांची शेतकरी बचाव कृती समिती स्थापन केलेली असुन समितीचे अध्यक्ष बाबा सर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी नऊ वाजल्यापासून माजलगाव शहरात रॅली निघाली व व्यापारी बांधवांना बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले,माजलगाव शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी शेतकरी बचाव कृती समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला माजलगाव शहर अतिरिक्त ग्रामीण भागातही प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून या आंदोलनात शेतकरी बचाव कृती समितीचे उपाध्यक्ष तथा शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई अॅड.नारायण गोलेपाटील माकपाचे कॉम्रेड बाबासर, अडवोकेट सय्यद याकुब, मानवी हक्क अभियान चे राजेश घोडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमित नाटकर, काँग्रेसचे नारायण होके पाटील, हरिभाऊ सोळंके, शेख अहेमद, शेख रशीद, शेख जानू शाह, बसपाचे अमोल डोंगरे, मौलाना अब्दुल कलाम आझाद चे नुमान चाऊस, संभाजी ब्रिगेडचे विजय दराडे, वंचित चे धम्मानंद साळवे, अंकुश राव जाधव सहभागी झाले होते.
No comments