Breaking News

अपघात ग्रस्त व्यक्ती रस्त्यावर पडलेली दिसताच माजी आ.भीमराव धोंडे यांनी गाडी थांबवून तातडीने केली मदत

के. के. निकाळजे । आष्टी  

माजी आ.भीमराव धोंडे बीडवरून आष्टीकडे येत असताना पांढरी जवळ अपघात ग्रस्त व्यक्ती पडलेली दिसताच गाडी थांबवून  अपघात ग्रस्त व्यक्तीला तातडीने आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात  स्वतःच्या गाडीत घेऊन जाऊन दाखल केले. त्यानंतर अपघात ग्रस्त व्यक्तीच्या नातेवाईक दवाखान्यात येईपर्यंत त्या व्यक्तीसोबत राहून त्या व्यक्तीच्या उपचारासाठी मदत केली.

   

माजी आ भीमराव धोंडे बुधवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास बीडहुन आष्टी कडे येत होते .  या  प्रवास करत  असताना  मा.आ.भीमराव धोंडे  यांना पांढरी (ता.आष्टी) या गावाजवळ मोटार सायकल आणि पिकअपचा अपघातात मोटार सायकल वरील व्यक्ती जखमी झालेली होती. जखमी व्यक्ती दिसताच क्षणी धोंडे यांनी गाडी थांबवून त्या व्यक्तीला स्वतःच्या वाहनातून शासकीय ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे दाखल केले तसेच जखमी व्यक्तीचे नातेवाईक येईपर्यंत स्वतः दवाखान्यात थांबून वेळेत उपचार मिळवून दिले. अपघातग्रस्त व्यक्ती कर्हेवाडी ता.आष्टी येथील महादेव मारुती सांगळे हे असल्याचे समजते. महादेव सांगळे यांच्या कुटुंबीयांनी मा. आ.धोंडे यांचे आभार व्यक्त केले.

No comments