Breaking News

स्वच्छतेतून समृद्धीकडे वाटचाल होते - सरपंच पल्लवी विनोद कवडे


चाकरवाडीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्वच्छता अभियान संपन्न

बीड :  तालुक्यातील जि.प.प्राथमीक शाळा, श्री क्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी भारतरत्न.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनाचे औचित्य साधत स्वच्छता अभियानाचे आयोजन केले होते. यावेळी सरपंच पल्लवी विनोद कवडे यांनी गावकर्यांना संबोधित करताना स्वच्छतेतून गाव समृद्धीकडे जाते, आपले गाव स्वच्छ राखण्याची जबाबदारी आपलीच आहे असे त्यांनी म्हंटले.    
        

या स्वच्छता अभियानात गावातील सर्व सुजाण नागरिक, महिला, तरुण, वृद्ध सर्वानी सहभाग नोंदवला होता. गावच्या सरपंच सौ.पल्लवी विनोद कवडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या  कार्यक्रमात गावकरी स्वेछेने सहभागी झाले होते. येत्या 6 डिसेंबर रोजी अभिवादन कार्यक्रम शाळेमधेच ठेवला असुन सर्व गावकरी यामधे सहभागी व्हावे असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी गावकर्यांना केले. No comments