Breaking News

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवसंग्रामच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन - ऍड राहुल मस्के


महारक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, ऑनलाईन व्याख्यान स्पर्धांचा समावेश 

बीड :. शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बीड शहरात महारक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान व मराठवाडा स्तरीय ऑनलाईन व्याख्यान स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसंग्रामचे जेष्ठ नेते ऍड राहुल मस्के यांनी दिली आहे. हि सर्व उपक्रम टप्प्याटप्याने आयोजित करण्यात येणार आहेत.

   

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बीड शहरात दि ०५ डिसेंबर रोजी स्वच्छता अभियान हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथपर्यंत सुभाष रोडवर सकाळी ९ वाजल्यापासून राबविण्यात येणार आहे. महारक्तदान शिबीर हे महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच ६ डिसेंबर रोजी चमन गार्डन परिसरात, भीमसृष्टीच्या नजीक सकाळी ८ वाजल्यापासून आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात स्वयंस्फूर्तीने रक्तदानात सहभाग घेऊ  इच्छिणाऱ्यांनी ७५१७६०६१५८/८९५६४६१५७३ या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करायची आहे. 

 

याचबरोबर मराठवाडा स्तरीय ऑनलाईन व्याख्यान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून "भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व आरक्षण भूमिका" या विषयावर हि स्पर्धा असणार आहे. यामध्ये प्रथम पारितोषिक हे १०००० रुपये, द्वितीय ७००० रुपये, तृतीय ५००० रुपये असणार असून उत्तेजनार्थ ५  बक्षिसे हि प्रत्येकी ३००० रुपयांची शिवसंग्राम बीड जिल्ह्याच्या वतीने ठेवण्यात आलेली आहेत. स्पर्धेत सहभागी घेऊ इच्छिणार्यांनी वरील विषयानुरूप व्याख्यानाचा ३ ते ५ मिनिटांचा व्हिडीओ हा दि ६ डिसेंबर रोजीच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत ९६८९०४३९४९ या व्हाट्सअप क्रमांकावर किंवा shivsangrambhavanbeed@gmail.com या मेलवर पाठवावा. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी ९३८६६४६४६४/९८६०७९४२०२/९५६१५५५९२३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन शिवसंग्रामच्या वतीने करण्यात आले आहे.

  सर्व  उपक्रमांमध्ये कोरोनापासून बचावाची खबरदारी घेण्यात येणार आहे. शिवसंग्राम, बीडच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, स्वच्छता मोहिमेत बीडकरांनी यावे व उदयोन्मुख व्याख्याते, अभ्यासक, चळवळीतील कार्यकर्त्यांनी ऑनलाईन व्याख्यान स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन शिवसंग्रामचे जेष्ठ नेते ऍड राहुल मस्के यांनी केले आहे. 


No comments