Breaking News

आष्टी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी अपघातग्रस्त व्यक्तीचे पन्नास हजार रुपये पोलीस जायभाये यांनी केले परत


के. के. निकाळजे । आष्टी 

आष्टी ते कडा महामार्गावर गुरुवारी (दि.23) सायंकाळी  ४.३० वाजण्याच्या सुमारास संदीप मोफजी गांगुर्डे हे मुर्शदपूर येथील हंबर्डे पंपासमोर पडलेले अवस्थेत दिसताच पेट्रोलिंग करत असलेले पोलीस जायभाये यांनी जखमीला तातडीने दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.


त्यांना त्या जागेवर पन्नास हजार रुपये रक्कम पडलेले मिळून आली. पोलीस जायभाये यांनी अपघात ग्रस्त व्यक्तीचे पन्नास हजार रुपये बीड सांगावी येथील नातेवाईक दत्तात्रय बावणे यांना बोलावून आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांचे हस्ते देण्यात आले. त्यामुळे आष्टी पोलिसांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments