Breaking News

आष्टीत शासकीय कापूस खरेदी केंद्र चार दिवसात सुरू होणार तर पाच ठिकाणी तुर खरेदी केंद्रास मान्यता -आ. बाळासाहेब आजबे


के. के. निकाळजे । आष्टी

आष्टी मतदारसंघात शेतकऱ्यांकडील कापूस खरेदीसाठी  शासकीय हमी भावाने येत्या दोन ते चार दिवसात कापूस खरेदी केंद्र आष्टी  येथील किसान क्रांती जिनिंग मध्ये सुरु होणार आहे तसेच कडा येथे मका व बाजरीचे शासकीय खरेदी केंद्र देखील सुरू करण्यात आले आहे व तुरीसाठी ही तालुक्यात पाच खरेदी केंद्रास मान्यता मिळाली असून येत्या दहा दिवसांमध्ये ऑनलाईन नोंदणी सुरुवात होणार आहे तरी शेतकऱ्यांनी शासकीय हमी भावानेच मका, बाजरी, तुर, कापूस विक्री करावा असे आवाहन आमदार बाळासाहेब आजबे यांनी केले आहे.

  गेल्या पाच वर्षापासून आष्टी तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्रस शासन मान्यता मिळाली नव्हती परंतु शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता  यावर्षी आष्टी येथे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी आपण गेल्या काही दिवसापासून सहकार मंत्र्यांना भेटून केली होती त्याची दखल घेत आष्टी येथे किसान क्रांती जिनिंग व प्रेसिंग मध्ये कापूस खरेदीस सुरुवात होणार आहे, तसेच  शेतकऱ्यांनी  घाम गाळून यावर्षी  तुरीचे विक्रमी उत्पादन घेतले असून  शेतकऱ्यांचे कष्ट वाया जाऊ नयेत त्यांची लुट होऊ नये यासाठी आपण यावर्षी  तालुक्यांमध्ये  तुरीसाठी कधी नव्हे ते पाच शासकीय खरेदी केंद्रास मंजुरी आणली असून शेतकऱ्यांना  कसलीही अडचण येणार नाही  याची काळजी घेतली जाणार आहे,  येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये  तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे शेतकऱ्यांनी घाई  न करता आपले नुसकान टाळण्यासाठी शासकीय  खरेदी केंद्रावर आपला माल विक्री करावा, आष्टी या भागामध्ये या वर्षी कापसाची लागवड कमी प्रमाणात असल्याने याठिकाणी शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यास कोणीही उत्सुक नसल्याने अद्याप पर्यंत हे केंद्र सुरू झाले नव्हते परंतु किसान क्रांती जिनिंग व प्रेसिंग ने कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यास पुढाकार घेतल्याने आपण सहकार मंत्र्यांना भेटून या ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केल्यानंतर तात्काळ सहकारमंत्र्यांनी यास परवानगी देऊन कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे अशी माहिती आमदार बाळासाहेब आजबे यांनी दिली.

No comments