Breaking News

माजी विद्यार्थ्यांनी लोकवर्गणी जमा करून शाळेची रंगरंगोटी करुन केला कायापालट


पहाडी पारगाव येथील नोकरदारांचा स्तुत्य उपक्रम

जगदीश गोरे । धारूर 

धारूर तालुक्यातील पहाडी पारगाव येथील माजी विद्यार्थ्यांनी लोकवर्गणी जमा करून जिल्हा परिषद शाळेची रंगरंगोटी करून स्तुत्य उपक्रम राबवुन तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे.

डोंगरपट्टा हा ऊसतोड मजुरांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो परंतु हे ऊसतोड मजुरांच्या मुलांनी आपल्या स्वकर्तृत्वावर मेहनत, जिद्द,चिकाटीने वेगवेगळ्या ठिकाणी आपला ठसा उमटवला आहे. पहाडी पारगाव हे डोंगराळ भागात वसलेले गाव व या गावात जिल्हा परिषद शाळा पहिली ते आठवीपर्यंत असुन पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना वडवणी, धारूर, बीड, अंबाजोगाई येथे शिक्षणासाठी जावे लागते. 

हे शिक्षण घेत असताना अनेक युवक आपल्या स्वा:ताहाच्या हिमतीवर आर्मी सौनिक, डॉक्टर, शिक्षक, प्राध्यपक, वनरक्षक, पोलिस, एसटी महामंडळात चालक, वाहक, कृषी सहायक,तलाठी, ग्रामसेवक,आरोग्य कर्मचारी व खाजगी कंपनीत आशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत तरी सुद्धा ह्या आपल्या गावच्या मातीचा त्यांना विसर पडला नसल्याने ज्या जिल्हा परिषद शाळेत आपले बालपणीचे शिक्षण झाले आहे त्या शाळेची पडझड युवकांनी आपल्या गावी आल्यावर पाहिली आपण ज्या शाळेत शिकलो व आपण नोकरीला लागलो त्या शाळेचा कायपालट करू व काही युवकांनी पुढाकार घेऊन स्वईच्छेने एक हजार रुपयांच्या पुढे वर्गणी जमा करण्याचे आवाहन केले अन् बघता बघता 50388 रूपयांचा निधी जमा झाला आणी या पहाडी पारगाव येथील माजी विद्यार्थ्यांनी व नोकरदारांनी जिल्हा परिषद शाळेचे रंगरंगोटी करून रुपच बदलून कायापालट करून टाकले असुन या तालुक्यात या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातुन कौतुक होत असुन डोंगरपट्यात या युवकांनी आदर्श निर्माण केला आहे.
No comments