Breaking News

उपसरपंच गित्ते यांच्या राजीनाम्या बाबत ११ डिसेंबर रोजी विशेष सभा

 

गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील साळेगावचे उपसरपंच श्रीमंत गित्ते यांनी दि.३० नोव्हेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यावर चर्चा करून कार्यवाही करण्यासाठी दि.११ डिसेंबर रोजी एक विशेष सभा बोलावली आहे. 

या बाबतची माहिती अशी की, साळेगाव ता. केज येथील ग्रामपंचायततीचे उपसरपंच श्रीमंत गित्ते यांनी दि. ३० नोव्हेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा सरपंच कैलास जाधव यांच्याकडे दिला आहे. राजीनाम्यातील कारण जरी वैक्तिक स्वरूपाचे असले तरी त्यांच्यावर सदस्यांचा गैरविश्वास निर्माण झाल्याची चर्चा आहे. 

दरम्यान सदर राजीनाम्यावर रीतसर कार्यवाही करण्या संदर्भात मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार सरपंच कैलास जाधव यांनी दि.११ डिसेंबर रोजी एक विशेष सभा बोलावली आहे.  ही विशेष सभा सरपंच कैलास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून त्या सभेत उपसरपंच यांच्या राजीनाम्या बाबत कार्यवाही होणार असल्याची माहिती ग्रामसेवक दत्तात्रय गव्हाणे यांनी दिली आहे.


No comments