Breaking News

बीड जिल्ह्यातील युवक व युवतींनी मतदार यादी मध्ये नाव नोंदणी करा,युवराज खटके


के. के. निकाळजे । आष्टी  

बीड जिल्ह्यातील अठरा वर्ष पुढील युवकांनी व युतीनी आपले नाव मतदार यादी मध्ये येण्यासाठी नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू झाला असून वय 18 पूर्ण होणाऱ्या नवीन मतदारांनी आपली नावे मतदान यादीत नोंदणीचे आवाहन युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष.मा.युवराज दादा खटके यांनी केले आहे.

बीड जिल्ह्यातील युवक व युवतींनी मतदान यादी मध्ये नाव नोंदणी साठी आपल्या गावातील मराठी शाळा.अंगणवाडी सेविका.निवडणूक विभागाकडे संपर्क साधावा नवीन मतदार नोंदणीसाठी लागणारे कागदपत्रे जन्म पुरावा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईट सर्टिफिकेट रहिवासी दाखला ग्रामसेवक किंवा तलाठी यांचे सहीचा असावा आधार कार्ड झेरॉक्स कलर पासपोर्ट फोटो घरातील नात्यातील आई-वडील भाऊ-बहीण यांच्यापैकी एकाचे ज्याचे नाव अगोदर मतदार यादी मध्ये समाविष्ट असेल तर त्याच्या मतदार ओळखपत्राची झेरॉक्स असे कागदपत्रे लागत,असल्याचे देखील मा.युवराज खटके यांनी सांगितले.

तर मतदार यादीत सुनबाई चे नाव समाविष्ट करण्यासाठी कागदपत्रे जन्म पुरावा शाळा सोडल्याचा दाखला कलर फोटो पासपोर्ट साईज माहेरच्या गावातील मतदार यादीत नाव असेल तर ते नाव कमी केल्याचा दाखला माहेरच्या गावात मतदार यादी नाव नसेल तर यादीत नाव नसल्याचा दाखला पतीचे मतदान ओळखपत्र झेरॉक्स असल्यास लग्नपत्रिका मतदारांनी आपली नावे नोंदवून घ्यावी व मतदाराचा आपला हक्क अधिकार प्राप्त करावा असे आवाहन देखील युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष मा.युवराज दादा खटके यांनी केले आहे.
No comments