Breaking News

बीड जिल्ह्यातील वाळू माफिया यांच्यावर कार्यवाही करा-- डॉ गणेश ढवळे


बीड : जिल्ह्यातील अवैध खडी क्रेशर व वाळू माफियामुळे  प्रशासनाचे कोट्यावधीचे नुकसान होत असून पर्यावरणाचा व्हास होत असून याप्रसंगी वारंवार सामाजिक कार्यकर्ते व विविध दैनिकातून बातम्या प्रसिध्द होवूनही कठोर कार्यवाही केली जात नाही. महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन वाळू माफियाशी हितसंबंध जोपासत कार्यवाही करत नसल्यामुळे महसूल पथकावर वाळू माफियामार्फत हल्याचे प्रमाण वाढले असून याप्रसंगी कठोर कार्यवाही करण्यासाठी जिल्हा प्रशासन मानसिकदृष्टया कमकुवत ठरले असून खालील मागण्या संदर्भति तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी डॉ गणेश ढवळे व शेख युनूस यांनी केली आहे.

गेवराई तालुक्यातील पालख्या डोंगराशेजारी .संतोष गर्जे संचलित सहारा अनाथालय असून त्याठिकाणी अवैधरित्या खडी क्रेशर मुळे अनाथ बालके व सेवकांचे आरोग्य धोक्यात आले असून तात्काळ खड़ी क्रेशरची परवानगी रद्द करण्यात यावी. तसेच नियमबाह्य रित्या खड़ी क्रेशरला बीज पुरवठा करणान्या महावितरणच्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी.  आष्टी तालुक्यातील मौजे घोंगडेवाडी येथील श्री. अनिल माळशिखरे यांच्या शेतातील अवैध साठा केलेली 200 ब्रास वाळू तत्कालीन तहसिलदार निलीमा थेवूरकर यांनी मंडळाधिकारी, तलाठी आणि कर्मचारी यांच्या समक्ष पंचनामा करून जप्त करून रक्कम 54,19,020/- रूपयांचा रूपयांचा दंड सात दिवसाच्या आतमध्ये शासन दरबारी जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दोन महिन्यात तेथील वाळूसाठा गायब झाला. याप्रकरणी विविध दैनिकामध्ये बातमी प्रसिध्द झाल्यानंतर सुध्दा तत्कालीन तहसिलदार वैभव महेंद्रकर यांनी व ज्यांच्या ताब्यात वाळू साठा दिला ते श्री.भिमराव माळशिखरे यांचे थोरले बंधू पोलीस पाटील यांच्या ताब्यात दिला. मात्र याप्रकरणी जबाबदार तहसिलदार, मंडळाधिकारी, तलाठी व पोलीस पाटील यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी.

 

बीड तालुक्यातील मौजे पिंपरनई ग्रामपंचायत अंतर्गत अवैधरित्या तीन खुदानी एम.टी.मस्के कन्स्ट्रक्शन यांनी खोदल्या असून त्याचा वापर वरवटी, भाळवणी, लिंबागणेश तसेच पिंपरनई ते बांगरवाडा रस्त्यासाठी केला असून याप्रकरणी गौणखनिज चोरीकेल्याप्रकरणी चौकशी करून तात्काळ कार्यवाही करून योग्य तो दंड ठोठावण्यात यावा.या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे व शेख युनुस यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालया समोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.


No comments