Breaking News

माजलगाव पञकार संघाच्या अध्यक्ष पदी हरिश यादव सचिव रत्नाकर कुलथे


माजलगाव :  मुंबई मराठी पञकार परिषदेच्या कोर कमिटीची बैठक जेष्ठ पञकार सुभाष नाकलगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माजलगाव तालुका कार्यकारणीच्या झालेल्या निवडीत माजलगाव तालुका पञकार संघाचे माजी अध्यक्ष हरिश यादव यांची पुन्हा अध्यक्ष तर सचिव रत्नाकर कुलथे यांची निवड करण्यात आली.

  

पञकारचे देशातील आधारवड एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आसलेल्या मुंबई मराठी पञकार परिषदेच्या माजलगाव तालुक्यातील शाखा परिषदेचे उल्लेखनीय कार्य करत आहे.त्या नुसार परिषदेची नुतन कार्यकारणी व दर्पन ,पुरस्कार वितरण सोहळ्याच्या तयारी साठी पञकार संघाच्या कार्यालयात जेष्ठ पञकार जिल्हा कार्यकारणीचे पदाधिकारी जेष्ठ पञकार सुभाष नाकलगावकर यांच्या अध्याक्षेते खाली आयोजित केलेल्या बैठकीत सविस्तर चर्चा होवुन नुतन कार्यकारणी एकमताने निवडण्यात आली यात माजी अध्यक्ष आसलेले  हरिश यादव यांना पुन्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर सचिव म्हणुन रत्नाकर कुलथे यांना कायम ठेवले आहे. या वेळी माजी अध्यक्ष दिलिप झगडे जेष्ठ पञकार पांडुरंग उगले यांच्या सह माजलगाव तालुक्यातील परिषदेचे बहुसंख्य सदस्य या वेळी उपस्थित होते.No comments