Breaking News

हिवरा येथील अन्यायग्रस्त पिडीत कुटूंबावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावीत : माजी मंत्री बागवे, डॉ. मिलिंद आवाड सह अनेक नेत्यांची पत्रपरिषदेत मागणी

बाळासाहेब आडागळे । माजलगाव 

तालुक्यातील हिवरा येथील दलितांवर झालेल्या जातीय हल्यातील आरोपीस तात्काळ अटक करावी व पिडीत कुटूंबावरील  दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी माजी गृह  राज्यमंत्री रमेश बागवे व मानवी हक्क अभियानचे राष्ट्ीय अध्यक्ष डाॅ. मिलींद आवाड सह अनेक नेत्यांनी यांनी केली आहे. 

तालुक्यातील हिवरा येथे दलित कुटूंबावर झालेल्या हल्याच्या पाश्र्वभूमीवर माजी राज्यमंत्री रमेश बागवे व राज्य पातळीवरील समाजाचे नेत्यांनी हिवरा येथे भेट दिली यानंतर माजलगाव येथे दि. 20 डिसेंबर रोजी सांयकाळी ६ वाजता हाँटेल व्यंकटेश येथे आयोजित  पत्रकार परिषदेत नेत्यांनी मागणी केली. या वेळी पुढे  बोलतांना  बागवे म्हणाले की, राज्यभरामध्ये मातंग समाजावर अन्याय अत्याचार होत आहेत. दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढत होत आहे असे असतांना मात्र या महाविकास आघाडी शासन या प्रकरणाची दखल देखिल घेत नाही. ही दुर्देवी बाब आहे. यावर सदनामध्ये चर्चा देखिल होत नाही. सामाजिक न्यायमंत्री याच जिल्ह्याचे असतांना त्यांनी अथवा इतर लोकप्रतिनिधींनी हिवरा येथे अत्याचारग्रस्त कुटूंबीयांची साधी भेट देखिल घेतली नाही. याची खंत वाटते. या प्रकरणातील गुन्हेगारांवर कडक शासन करावे व पिडीत लोकांना भरपाई द्यावी व त्यांचेवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत अशी मागणीही केली. यावेळी मानवी हक्क अभियानचे राष्ट्ीय अध्यक्ष डाॅ. मिलींद आवाड म्हणाले की, राज्यामध्ये अत्याचाराच्या घटना होउ नयेत याकरीता समाजबांधव एकसंघ होत आहे. आगामी काळात अशा घटना झाल्यास मुंबई येथे मोठे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी हनुमंत साठे, दिलीप आगळे, अनिल हातांगळे, मनोज कांबळे, बालासाहेब भांडे, नारायण पाटोळे, विठ्ठल गायकवाड, राजेश घोडे, मधुकर कांबळे यांची उपस्थिती होती.
No comments