Breaking News

बाहेरच्या जिल्ह्यातील उसाच्या गाड्या अडवण्यासाठी सोमठाणा रस्त्यावर शेतकर्‍यांचा ठिय्या


 बाळासाहेब देशमाने । माजलगाव   

तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊस असतानाही तालुक्यातील तिन्ही कारखाने बाहेरच्या जिल्ह्यातून ऊस आणत असल्याने बाहेरचा ऊस आणणं बंद करण्यात यावे, या मागणीसाठी सोमठाणा रस्त्यावर बाहेरच्या गाड्या अडवण्यासाठी दि ०५ डिसेंबर शनिवार पासुन  शेतकर्‍यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे.हे आंदोलन शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून  आज दि ०६ डिसेंबर रविवार रोजी याच ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

 माजलगाव तालुक्यामध्ये उसाचे क्षेत्र जास्तीचे आहे. या तालुक्यात तीन कारखाने आहेत. या कारखान्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील संपुर्ण ऊस गाळप करण्याऐवजी इतर जिल्ह्यातून ऊस मागवला आहे त्यामुळे स्थानिकच्या शेतकर्‍यांवर अन्याय होऊ लागला. स्थानिकचा ऊस कधी गाळप करणार? बाहेरचा ऊस आणणे बंद करण्यात यावे यासाठी माजलगाव तालुक्यातील सोमठाणा रस्त्यावर शेतकर्‍यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे.

हे आंदोलन गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून या आंदोलनात अनेक शेतकर्‍यांनी सहभाग घेतलेला आहे. याची दखल प्रशासकीय विभाग आणि संबंधित कारखान्यांनी न घेतल्यास आज दि ०६ डिसेंबर रविवार रोजी याच ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे गंगाभीषण थावरे यांनी म्हटले आहे.


No comments