Breaking News

बीडमध्ये भंगारच्या दुकानाची पोलिसांकडून झाडाझडती


आठ व्यवसायिकांवर गुन्हे दाखल
:
दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई

बीड : भंगार खरेदी- विक्रीच्या नोंदी अद्यावत न ठेवल्यामुळे तसेच पोलिसांनी दिलेल्या सूचनांचा भंग केल्याप्रकरणी बीड शहरातील ८ भंगाराच्या दुकानांवर कारवाई करुन दुकानदारांवर संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानं अन्य दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. 


मिळालेल्या माहितीनुसार पोलिस अधीक्षक आर. राजस्वामी यांनी दहशतवाद विरोधी कक्षाला दिलेल्या आदेशानुसार बीड जिल्ह्यातील भंगार व्यावसायिक, लॉज, सिम कार्ड विक्रते, सायबर कॅफे, कुरिअर सेवा यांची तपासणी केली जात आहे. बीड शहरात गेल्या तीन दिवसांपासून दहशतवाद विरोधी पथक भंगार व्यावसायिक, लॉज, सिम कार्ड विक्रते, सायबर कॅफे, कुरिअर सेवा यांची झाडाझडती घेत आहे. या मोहिमे अंतर्गत बीड व पेठबीड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकूण आठ भंगारच्या दुकानांची तपासणी केली असता या दुकानांमध्ये भंगार खरेदी-विक्रीच्या अद्यावत नोंदी ठेवलेल्या आढळून आल्या नाहीत. शिवाय पोलिसांनी दिलेल्या सूचनांचा भंग केल्याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात भंगार व्यावसायिक यांच्या विरुद्ध भादवी कलम १८८ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी कक्षाचे पोलिस उप निरीक्षक व्ही. के. जोगदंड, पोलिस अंमलदार राजेभाऊ नागरगोजे, उस्मान शेख, पो. ना. राहुल घाडगे, गणेश पवार, पोकॉ. एम. जे. मुंडे यांनी केली. 

.....तर अन्यथा कारवाई !

बीड जिल्ह्यातील भंगार व्यावसायिक, लॉज, सिम कार्ड विक्रते, सायबर कॅफे, कुरिअर सेवा पुरवणाऱ्या व्यावसायिकांनी खरेदी- विक्रीच्या नोंदी ठेवून पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे; अन्यथा उल्लंघन करणाऱ्या व्यवसायिकांवर कारवाई करण्यात येईल असं आवाहन बीड पोलिस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. 
No comments