Breaking News

शरद पवार यांचा वाढदिवस आमच्यासाठी उर्जादायी - अमरसिंह पंडित


सैन्यदलात भरती होणार्या युवकांच्या परिवारातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार

खा. शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त अमरसिंह पंडित यांची घोषणा

गेवराई : श्रद्धेय खा. शरद पवार यांचा वाढदिवस माझ्या सारख्या कार्यकर्त्यांसाठी उर्जादायी असतो, वाढदिवसाच्या औचित्याने अनेक नविन उपक्रमांचा संकल्प निश्‍चित केला जातो. गेवराई विधानसभा मतदार संघातील जे युवक भारतीय सैन्य दलात भरती होतील त्या युवकांच्या परिवारातील विद्यार्थ्यांचा इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिक्षणाचा खर्च शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातुन करण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी केली. खा.शरद पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते सैन्यदलात भरती झालेल्या युवकांचा गौरव करण्यात आला. 


पद्मविभुषण खा. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने गेवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात गेवराई विधानसभा मतदार संघातुन भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या सोळा युवकांचा गौरव करण्यात आला. यावेळी व्यवपिठावर माजी आ. अमरसिंह पंडित, बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, जिल्हा परिषदेचे सभापती बाबुराव जाधव, बाळासाहेब मस्के, बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, जयभवानी कारखान्याचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, जि.प.सदस्य ङ्गुलचंद बोरकर, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मुंबई येथील मुख्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण गेवराई येथे यावेळी समारंभपुर्वक उपस्थितांना दाखविण्यात आले. 

श्रद्धेय खा. शरदचंद्र्जी पवार यांचा वाढदिवस संकल्प दिन म्हणुन आम्ही साजरा करत असतो, या वाढदिवसाच्या औचित्याने दरवर्षी नवनविन उपक्रमांचे संकल्प केले जातत यावर्षी पासुन गेवराई विधाससभा मतदार संघातुन भारतीय सैन्य दलात भरती होणार्या युवकांच्या परिवारातील जे विद्यार्थी जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळा आणि महाविद्यालयात शिक्षण घेत असतील त्या विद्यार्थ्यांचा इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणाचा खर्च शारदा प्रतिष्ठानकडुन करण्याचा संकल्प करत असल्याची मोठी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस माजी आ. अमरसिंह पंडित यांनी केली. प्रास्तविकपर भाषणात विजयसिंह पंडित यांनी पद्मविभुषण खा. शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढवा घेत त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. 

यावेळी किसन दराडे, आकाश सागडे, मारोती बोरकर, महादेव राठोड, भगवान ढाकणे, योगेश मुंडे, राजकुमार नाकाडे, करण मोंढे, उमेश गोरे, संतोष गरड, विशाल डोंगरे, महेश काळे, ऋषिकेश इथापे, शहाजी थिटे, पवन महारगुडे, गणेश जोगदंड या सैन्य दलात भरती झालेल्या युवकांचा पुष्पहार, शाल, श्रीङ्गळ व स्ङ्गुर्तीचिन्ह देवुन गौरव करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी पंचायत समिती सदस्या कु. मोनिका भरतराव खरात यांची तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या शहराध्यक्ष पदी सौ. मुक्ता डिगांबर आर्दड - मोटे यांची निवड झाल्या बद्दल त्यांना नियुक्तीपत्र देवुन सन्मानित करण्यात आले. 

या प्रसंगी गेवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह खा. शरद पवार यांच्यावर प्रेम करणारे समाजाच्या विविध घटकातील प्रतिष्ठीत नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.No comments