Breaking News

धनंजय मुंडे गोपीनाथगडावर नतमस्तक..!


आजही तुम्ही आमच्यात नाहीत, ही गोष्ट मन मान्य करत नाही - धनंजय मुंडेंचे भावोद्गार

परळी : माजी केंद्रीय मंत्री दिवंगत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे पुतणे, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी गोपीनाथगड येथील स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केले. 


परळी तालुक्यातील गोपीनाथगड या स्मृतिस्थळी धनंजय मुंडे यांनी येऊन दर्शन घेतले. यावेळी स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब ज्याप्रमाणे गोरगरीब दीन दुबळ्यांची सेवा करत, त्याचाच वसा घेऊन, त्यांच्याच संघर्षाचा वारसा आणि प्रेरणा घेऊन आपण काम करत असल्याचेही ना. मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांनी दुपारी चार वाजता पांगरी येथील गोपीनाथ गडावर जाऊन अभिवादन केले. स्व. मुंडे साहेबांना ते अप्पा म्हणत, अप्पांच्या चरणी सदैव नतमस्तक असल्याचे म्हणत ना. मुंडेंनी लहानापासून स्व. मुंडे साहेबांच्या सान्निध्यात घालवलेल्या आठवणींना उजाळा दिला.
No comments