Breaking News

नवीन अकृषी परवाना व गुंठेवारी देण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी : बसपाच्या कापसे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी


बीड :  नवीन अकृषिक परवाना व गुंठेवारी देण्याकरता एक खिडकी योजना राबवावी व ऑनलाइन माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. प्लॉट, घर खरेदी करणाऱ्यांना तात्काळ कृषी परवाना उपलब्ध करून द्यावा व सर्व सामान्य माणसाला दिलासा देण्यात यावा अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा बीड जिल्हा प्रभारी सतिष कापसे यांनी जिखाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. 


दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात असलेली अकृषी परवाने ही तात्पुरत्या स्वरूपाची असून ती बोगस असल्याचे वृत्तपत्रात मध्ये छापून येत आहे. मात्र यावर जिल्हाधिकारी कार्यालय व महसूल प्रशासनाकडून कसल्याही प्रकारची या  प्रश्नावर दखल घेतली जात नसल्याचा आरोप करून  सर्वसामान्य जनतेला प्लॉट खरेदी विक्री, घर खरेदी विक्री करतांना वेठीस धरले जात असल्याचे कापसे यांनी म्हटले असून अकृषी परवाने पंधरा ते वीस वर्षांपूर्वी असल्यामुळे कागदोपत्री खरा आहे की खोटा आहे हे कळत नसल्याचे ते म्हणाले. 

मात्र जिल्हा प्रशासनाने यावर ताबडतोब उपाय म्हणून नवीन अकृषिक परवाना व गुंठेवारी देण्याकरता एक खिडकी योजना राबवावी व ऑनलाइन माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. प्लॉट, घर खरेदी करणाऱ्यांना तात्काळ कृषी परवाना उपलब्ध करून द्यावा व सर्व सामान्य माणसाला दिलासा देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात अकृषी परवाना नावाखाली प्लॉट, घर खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झालेले आहेत मात्र शासनाने याकरता कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत एकीकडे शासनाचा महसूल बुडत आहे तर दुसरीकडे सर्वसामान्य माणसाची पिळवणूक होत आहे.


आर्थिक अडचणीमुळे कोणी प्लॉट विकत आहे तर कोणी घर विकत आहे मात्र शासनाच्या वतीने नवीन गुंठेवारी व कृषी परवान्याची कोणतीही सुविधा प्लॉट धारकासाठी नाही ही मात्र शोकांतिका आहे. करिता जिल्हाधिकारी यांनी नगर रचना विभाग गुंठेवारी व तहसील कार्यालयातून कृषी परवाने तात्काळ देण्याची सुविधा प्लॉट व घर धारकांना उपलब्ध करून देण्यात यावी .अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे कापसे यांनी केली आहे. 


No comments