Breaking News

वडवणी तालुका शिवसेनेच्या वतीने माजी मंञी जयदत्त क्षीरसागर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा


 

जगदीश गोरे । वडवणी

वडवणी येथे शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या वाढदिवस वडवणी शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे मा.तालुकाप्रमुख विनायक बप्पा मुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक उपक्रम राबवुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यामध्ये वडवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णांना फळे वाटप, गरोदर महिलांना ब्लँकेट रगीचे वाटप, वडवणी शहरातील गोर-गरिब लोकांना ब्लॅकेट रगीचे वाटप, तसेच ऊसतोड मजुरांना ब्लॅकेट रगीचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख नागेश डिगे, युवा नेते वचिष्ट शेंडगे, उपशहर प्रमुख अशोक चाटे, मुन्ना पवार, कल्याण राऊत, नितिन नांदुरकर, युवासेना शहर प्रमुख भैय्या खोसे शिवसेना युवा नेते गणेश म्हेत्रे, डिंगाबर आलगट, संजय धपाटे, अशोक गोंडे, अशोक वारे, गणेश माळवदे, अमर रोकडे सचिन दिवटे, अशोक वारे, सुभाष झाडे, अभिषेक आलगट आदि शिवसैनिक, शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments