Breaking News

आंदोलकावरील हल्ले, व दडपशाही थांबवून, मागण्या मान्य करा. भाई अॅड.नारायण गोले पाटील


बाळासाहेब आडागळे । माजलगाव

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भातील आंदोलनाचा केंद्र शासनाने सकारात्मक विचार करून शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात व शेतकरी विरोधी कायदे रद्द करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून बीड जिल्हाभर तीव्र आंदोलने करण्यात येतील, असा इशारा भाई अॅड.नारायण गोले पाटील यांनी उप विभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यावर होत असलेला हल्ला,लोकशाहीला काळीमा फासणारा असून केंद्र शासनाचे हे कृत्य शेतकरीविरोधी लोकशाहीविरोधी असून मोदी सरकारने शेतकऱ्यावर ची दडपशाहीने त्वरित थांबवावी व शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात अन्यथा तिव्र अंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई अॅड.नारायण गोलेपाटील यांनी मा. उपविभागीय अधिकारी साहेब, उपविभागीय अधिकारी कार्यालय माजलगाव यांना निवेदनाव्दारे दिला आहे या निवेदनावर राजेभाऊ घोडके, राहुल सोळंके, लहु सोळंके, सिध्देश्वर गायकवाड ,सुदाम चव्हाण, व्यंकटेश खुळे, राहुल मापाडे, अशोक माळेकर, समिर देशमुख, कल्याण शेप, शेख मैनुदिन, विलास साळवे, पांडुरंग मुंडे आदीच्या सह्या आहेत.


No comments