Breaking News

शेत रस्त्याच्या मागणीसाठी केज तहसील समोर शेतकऱ्यांचे उपोषण


गौतम बचुटे । केज 

शेतरस्त्याच्या मागणी साठी केज तालुक्यातील सोनेसांगवी (सुर्डी) येथील शेतकरी केज तहसील कार्यालया समोर उपोषणाला बसले आहेत. 

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील सोनेसांगवी (सुर्डी) येथील गट नंबर/ सर्व्ह नंबर  २३, २४, २५, २८ मधून पुढील सर्व्हे नंबर १५, १६, ८, ७ व १११ या रस्त्या करीता अनेक वेळा तहसील कार्यालयाकडे अर्ज देऊनही त्यावर कार्यवाही न झाल्यामुळे येथील शेतकरी हे दि.२ डिसेंबर पासून केज तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसले आहेत. निवेदनावर सर्जेराव लांडगे, दशरथ नाईकवाडे, नितीन गुळवे, सचिन लांडगे, भारत गुळवे, विकास गुळवे, प्रदीप गुळवे, रामराजे गुळवे, नामदेव डिकले, सुंदर डिकले, महादेव डिकले, शौकत तांबोळी, विनोद कणसे, शिवाजी ईखे, राहुल डिकले, पांडुरंग ईटकर, अरुण ईटकर अशा १७ उपोषणार्थीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सदर रस्त्याच्या प्रकरणी प्रभारी मंडळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सदर प्रकरण हे न्यायप्रविष्ट असल्याची माहिती दिली.


No comments