Breaking News

छत्रपती कारखान्याच्या ऊस बिलाचा पहिला हप्ता बँकेत वर्ग - कार्यकारी संचालक महेश सगरे

बाळासाहेब आडागळे । माजलगाव  

सावरगाव येथील छत्रपती साखर कारखान्याने गाळप हंगाम 2020 -21 मध्ये आज अखेर एकूण गाळप 95000 मे.टन ऊसाचे गाळप केले असून कारखान्याने दि.25/10/2020 ते 30/11/2020 पर्यंतच्या ऊस बिलाचा पहिला हप्ता 1900/- रु.प्रति टना प्रमाणे काढलेले आहेत.  माजलगाव तालुक्यातील  तसेच कार्यक्षेत्रातील  इतर कारखान्यापेक्षा  गाळप क्षमता व विविध पदार्थाचे कोणतेही प्रकल्प नसताना  माजी आमदार तथा चेअरमन श्री बाजीराव सोनाजीराव जगताप यांनी  शेतकऱ्यांचे हित जपत ऊस बिलाचा पहिला हप्ता काढला आहे. 


तसेच कारखान्याने गाळप हंगाम 2019-20 मधील उर्वरित राहिलेल्या ऊस बिलाची रक्कम लवकरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खाती वर्ग करण्यात येईल. कारखान्याचे दि.25/10/2020 ते  दि.30/11/2020  पर्यंत 70807.115 मे. टन उसाचे गाळप झालेले असून यामध्ये एकूण  688 शेतकऱ्यांचे ऊस बिलाचा पहिला हप्ता रु.1900/- रु. प्रति टना  प्रमाणे एकूण रु.13,30,28,167/- बँकेत वर्ग केले असून उर्वरित राहिलेल्या ऊस बिलाच्या रकमेचे टप्प्याने लवकरच ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल.  याप्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन मोहनराव जगताप, संचालक मंडळ तसेच कार्यकारी संचालक महेश सगरे सचिव चंद्रकुमार शेंडगे उपस्थित होते. तरी सर्व शेतकऱ्यांनी विभागीय शेतकी कार्यालयाशी संपर्क साधून संबंधित बँकेत बिल जमा करून घ्यावे अशी विनंती करण्यात आली आहे.No comments