Breaking News

पोकरा प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांसाठी कामे तातडीने पूर्ण करताना दिलासा देणारा लोकसंवाद वाढविला गेला पाहिजे--विकासचंद्र रस्तोगी


बीड :  पोकरा प्रकल्प अंतर्गत कामे पूर्ण करताना शेतकऱ्यांशी लोकसंवाद वाढविला गेला पाहिजे यासाठी गावातील कामांचे स्थिती व पूर्णत्व दाखविणारे नकाशे तसेच शिवार फेरी द्वारे त्यांना चर्चेतून शासन सोबत असल्याचा विश्वास दिला गेला पाहिजे असे प्रतिपादन विकासचंद्र रस्तोगी, प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोक्ररा) मुंबई यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पाच्या प्रगतीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठकीस  जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सह एस.एम.साळवे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, विजय कोळेकर कृषि विद्यावेत्ता,पोकरा प्रकल्प (ना.दे.कृ.सं.प्र., मुंबई), दादासाहेब वानखेडे डिआरडीए (प्र.सं.,जि.ग्रा.वि.यं.,बीड ) तसेच श्री.विजय कोल्हे, कृषि उपसंचालक सर्वाची उपस्थिती होती. सदर बैठकीत घटकनिहाय व कर्मचारीनिहाय आढावा घेण्यात आला. त्या अनुषंगाने संबधित अधिकारी कर्मचारी यांना तात्काळ प्रलंबित अर्जाचां निपटारा करण्याच्या सुचना देण्यात आल्या. यावेळी सदर बैठकीस जिल्हयातंर्गत सर्व उपविभागीय कृषि अधिकारी, प्रकल्प सहाय्यक, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक, समुह सहाय्यक तसेच जिल्हा व्यवस्थापन कक्षातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पोकरा प्रकल्प अंतर्गत विविध उपक्रमातून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत व कामांसाठी निधी मिळावी असे स्वरूप असून ग्रामपातळीवरील समित्या (व्ही सी आर एम सी ) ची तरतूद आहे. ग्रामसभेद्वारे निवड केलेल्या या समितीद्वारे प्रस्तावित केलेली कामे जिल्हास्तरीय समितीकडून मंजूर केली जातील. यामुळे प्रलंबित कामे व आवश्यक तांत्रिक मान्यता लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे लक्ष पुरविण्याची गरज आहे. यासाठी कृषी विभागांतर्गत कृषी मित्र , कृषी सहाय्यक,  यासह कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका स्तरावरील यंत्रणेने प्रयत्न करणे गरजेचे आहे . लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने यांना एन आर एम डीबीटी पोर्टल चा वापर केला जावा असे श्री.  रस्तोगी म्हणाले. 

जिल्हाधिकारी श्री रेखावार म्हणाले  तीन वर्षांपासून सुरू असलेला शासनाचा हा महत्त्वाकांक्षी व लाभार्थी शेतकऱ्यांसाठी तातडीने मोठा निधी उपलब्ध होणारा उपक्रम आहे. बीड जिल्ह्यात सदर पोकरा प्रकल्प यशस्वीरीत्या राबविला गेला पाहिजे  त्यांचे दुःख कमी करावे यासाठी उपक्रमातून जिल्ह्यात मदत पोहोचवून गाव व शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षित करता येईल यासाठी शेतकऱ्यांना मदत द्यावी . यातील कामकाजाची स्थिती सुधारण्याची गरज असून सदर कामांमध्ये दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे देखील यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले.

श्री विजय कोळेकर यांनी देखील यावेळी बैठकीत मार्गदर्शन केले ह्या प्रकल्पाचा अंतर्गत रेशीम प्रक्रिया,  अवजारे बँक, पशुखाद्य निर्मिती, सोयाबीन ऑइल मिल , आटा चक्की पाणी नियोजनासाठी प्रकल्प आदी विविध कामांबाबतची माहिती देण्यात आली. 

 

पोकरा योजनेअंतर्गत कामे तातडीने पूर्ण करताना झालेल्या कामांची पडताळणी करून त्याचे व्हेरिफिकेशन रिपोर्ट , जिओ टॅगिंग करून लाभार्थी शेतकऱ्यांना निधी वितरणसह प्रक्रिया पूर्ण केली जावी. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता यासाठी अडचण नसून पोकरा प्रकल्पाच्या प्रथम टप्प्याचा तीन वर्षाचा कालावधी संपत आल्याने उर्वरित महिन्यात कामे पूर्ण न झाल्यास संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांचे नुकसान होईल. जिल्ह्यातील माजलगाव उपविभाग अंतर्गत  50,146 , बीड उपविभाग अंतर्गत  43,071 व अंबाजोगाई अंतर्गत  39,251   कामांचा आराखड्यात समावेश करण्यात आला आहे.  बीड जिल्ह्यातील तीनही उपविभागांची आढावा घेताना साधारणतः जवळपास 58 कोटी रुपयांच्या प्रस्तावित कामांपैकी फक्त आठ कोटी रुपये पर्यंतची कामे मंजूर आहेत हे प्रमाण अतिशय कमी असल्याचे दिसून आल्याने यावेळी चिंता व्यक्त करण्यात आली. या कामांना गती देणे गरजेचे असल्याने संबंधितानी त्यांचे प्रस्ताव तातडीने जिल्हास्तरीय समितीकडे मंजुरीसाठी सादर करावेत असे यावेळेला सांगण्यात आले. तसेच नाबार्ड व अग्रणी बँक अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली घेऊन निधीबाबत च्या अडचणी सोडविण्यात याव्यात अशा सूचना करण्यात आल्या.

प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांची राक्षसभुवन येथे भेट

राज्य शासनाच्या नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा) चे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांनी नामदेव टिळेकर, प्रांतधिकारी बीड यांच्यासोबत मयत लाभार्थी शेतकरी बाळासाहेब ज्ञानोबा मस्के, रा.राक्षसभुवन, ता.जि.बीड यांच्या घरी जाऊन त्यांच्या परीवाराचे सात्वन केले व संबधित प्रकरणात दोषी असणान्या अधिकारी/ कर्मच्याऱ्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
No comments