पाणी देण्यावरुन भावनेच मोडला भावाचा पाय ..!
गौतम बचुटे । केज
सामाईक बोअरची विद्युत मोटार चालू करून पिकाला पाणी देण्याच्या कारणावरुन सख्ख्या भावाने लोखंडी गजाने केलेल्या मारहाणीत पाय फ्रॅक्चर झाल्याची घटना केज तालुक्यातील उमरी येथे घडली आहे.
या बाबतची माहिती अशी की, उमरी ता. केज येथे दि. १० डिसेंबर रोजी नवनाथ मुळे हे त्यांच्या भावा-भावात असलेल्या शेतातील सामायिक बोअरची विद्युत मोटार चालू करून शेतातील रब्बी पिकाला पाणी देत असताना त्यांचा सख्खा भाऊ विलास मुळे हा तेथे आला व त्याने नवनाथ मुळे यास शिवीगाळ करून तू सामाईक विद्युत मोटार का सुरु केली? असे विचारून शिविगाळ करीत भांडायला सुरुवात केली. तसेच हातातील लोखंडी गजाने नवनाथ यास गंभीर मारहाण सुरू केली.
या मारहाणीत नवनाथ मुळे याच्या उजव्या पायाला गंभीर मार लागला असून पाय फ्रॅक्चर झाला आहे. तसेच त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्या नंतर नवनाथ मुळे यांनी स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे उपचार करून पायला प्लास्टर करून परत आल्या नंतर दि. १५ डिसेंबर रोजी स्वतः हजर होवुन विलास मुळे यांच्या विरुद्ध केज पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी नुसार गु. र. नं. ५३०/२०२० भा. दं. वि. ३२६, ३२३, ५०४, ५०६ व ३४ नुसार दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी पोलीस नाईक धनपाल लोखंडे हे पुढील तपास करीत आहेत.
No comments