Breaking News

डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे समतेच्या विचारांचे माणिक-मोती- ॲड.सदानंद वाघमारे

  


बीड : महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व कार्याला जनप्रहार सामाजिक संघटना बीड जिल्ह्याच्या वतीने महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यात आले यावेळी संघटनेचे सचिव तथा विधी सल्लागार ॲड. सदानंद वाघमारे म्हणाले की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित शोषित घटकांसाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी आपले संपूर्ण जीवन पणाला लावले. 

शेतकरी कामगार कष्टकरी सुशिक्षित बेरोजगार तसेच महिलांच्या अधिकारांसाठी त्यांनी हिंदू कोड बिलाची स्थापना करून भारत देशातील सबंध महिलांना समतेच्या न्यायाच्या बाजूने आपले हक्क मांडण्यासाठी  मोलाचे योगदान दिले प्रखर नेते तथा वंचित बहुजनांचे महामेरू लोक नायक तथा शेतकरी कामगारांचे उद्धार करते म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगामध्ये ओळखले जातात समतेच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी वंचित बहुजन समाजाला तथागत बुद्धाचा शांतीचा मार्ग दाखवून त्यांनी देशांमध्ये युद्ध नको बुद्ध हवा अशी गर्जना करून बहुजन समाजामध्ये अंधश्रद्धा पुसून टाकण्यासाठी विज्ञानवादी धम्माकडे घेऊन जाण्याचे काम केले आहे.असे ही यावेळी जनप्रहार सामाजिक संघटनेचे सचिव तथा विधी सल्लागार ॲड. सदानंद वाघमारे यांनी जनप्रहार सामाजिक संघटनेच्या कार्यालयांमध्ये महापरिनिर्वाण दिनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना उपस्थितांना म्हणाले यावेळी जनप्रहार सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विजय गायकवाड संदीप जाधव संतोष जोगदंड प्रशांत कुलकर्णी विशाल जाधव प्रमोद ठोंबरे प्रसाद देशमुख मयांक वाघमारे आदी सह मोठ्या संख्येने अभिवादन करण्यास सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कळवले आहे.


No comments