Breaking News

करमाळ्यात बिबट्याची दहशत कायम : ३ फायर चुकवून, वन विभागाला चकवा


करमाळा : नरभक्षक बिबट्याचा थरार करमाळा तालुक्यातील बिटरगाव भागात पाहायला मिळाला. येथील एका शेतात मका टोचायचे काम सुरू असताना एक महिलेला दबा धरून बसलेला हा बिबट्या दिसला लगेच तिने जोरात ओरडत त्याच्या दिशेला दगड भिरकावत असताना त्याने अंगावर येण्याचा प्रयत्न केला.


मात्र यावेळी सोबतचे लोकांनीही गोंधळ घालत दगडांचा भडीमार सुरू केल्यावर बिबट्याने माघार घेतली. वन विभागही तातडीने तयारीसह येथे आला व ट्रॅप लावत बिबट्या नजरेस पडताच तीन फायर केले. मात्र यावेळीही दुर्दैवाने बिबट्या निसटला. मग बिबट्या लपलेल्या केळीच्या शेताला चारही बाजूने घेरण्यात आले.

दरम्यान बिबट्याच्या शोधासाठी वैदू जातीच्या लोकांनी एक गाडीतून त्यांची कुत्रीही आणली. शेजारी असलेल्या उसातून पळून जाऊ नये म्हणून जेसीबीच्या सहाय्याने ऊस पडला. अंधार पडू लागल्याने भोवती ट्रॅक्टर आणून दिवे लावण्यात आले. परिसरातील शेकडो ग्रामस्थ हातात काठ्या कुऱ्हाडी व मशाली घेऊन सज्ज होते. मात्र तीन तासाच्या प्रयत्नानंतरही बिबट्या निसटल्याने दहशत अजून वाढली आहे. ढोकरी - बीटरगाव येथील ट्रॅप मधून बिबट्याने पळ काढल्याने आता जवळपासच्या सर्व वस्तीवरील आणि ढोकरी, बिटरगाव, भिवरवाडी, वांगी 1 , वांगी 4 परिसरातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.No comments