Breaking News

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात जनकल्याण मेळावा उत्साहात


बाळासाहेब आडागळे । माजलगाव 

येथील श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्रात 'सदगुरू मोरेदादा चॅरिटेबल &मेडिकल ट्रस्ट' एक हजार बेडचे अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुख सुविधांनी युक्त असे हॉस्पिटल त्र्यंबकेश्वर येथे समस्त सेवेऱ्यांच्या एक एक रुपयाच्या योगदानातून निर्माण होत आहे. 

यासाठी परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशिर्वादाने व आदरणीय चंद्रकांत मोरे (दादासाहेब) यांच्या आदेशानुसार श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र, माजलगाव येथे जनकल्याण मेळावा संपन्न झाला, यासाठी श्री स्वामी समर्थ गुरुपीठाची तंत्र स्नेही टीम, तसेच बीड, परभणी जिल्ह्यातील जनकल्याण प्रतिनिधी, माजलगाव तालुक्यातील सर्व साप्ताहिक, दैनिक केंद्रातील महिला- पुरुष सेवेकरी उपस्थित होते. हा जनकल्याण मेळावा मास्क, सॅनिटाइजर, सोशल डिस्टन्स इत्यादी सर्व प्रशासनाचे नियम पाळून संपन्न झाला.


No comments