Breaking News

केज येथील ३० वर्षीय तरुण बेपत्ता

 

बेपत्ता तरुण देवानंद वाघमारे

गौतम बचुटे । केज  

केज येथील शिक्षक कॉलनीतून एक तीस वर्षीय तरुण बेपत्ता झाला असून केज पोलीस स्टेशनला त्याची नोंद घेण्यात आली आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज येथील शिक्षक कॉलनीत राहत असलेला देवानंद वाघमारे रा. सासुरा हा ३० वर्षाचा युवक हा दि. २८ नोव्हेंबर पासून केज येथील शिवाजी चौकातून परत येतो असे म्हणून बेपत्ता झाला आहे. त्याचा रंग गोरा, उंची ५ फूट २ इंच, सडपातळ बांधा, अंगात राखाडी रंगाचे टी शर्ट व काळी जीन्स पॅन्ट आणि पायात स्लिपर असा वेष आहे. या प्रकरणी त्याचा भाऊ विष्णू वाघमारे यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची नोंद घेण्यात आली असून पोलीस नाईक मंगेश भोले हे पुढील तपास करीत आहेत.


 


बेपत्ता होण्यापूर्वी देवानंद वाघमारे याने एक नऊ पानी पत्र लिहिले असून त्यात त्याला गावातील लोकांनी टिप्पर क्र. एम एच४४/९५७२ या वाहनाच्या व्यवहारात फसवले असल्याचा उल्लेख आहे.


No comments