Breaking News

उद्या पालकमंत्री धनंजय मुंडे घेणार आढावा बैठक


बीड : 
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि. 22 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात विविध कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे.

पालकमंत्री श्री मुडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या विविध बैठकांच्या  कामकाजाची  सूची व वेळ पुढीलप्रमाणे आहे.

सकाळी 10.30 वाजता कृषी विभाग आढावा (खरीप हंगाम 2020 मधील बोगस बियाणे/खते निविष्ठा बाबतत शेतकऱ्यांच्या प्राप्त तक्रारी व त्या अनुषंगाने कृषि विभागने केलेल्या कार्यावाही आणि शेतकऱ्यांना मिळोलभ्‍ नुकसान भरपाई,  मंजूर पीक विमा आढावा,  खरप व रब्बी 2020-1 कर्ज वाटपाचा आढावा), दुपारी 12 वाजता महावितरण विभागाचा कामकाजाचा आढावा (एच.व्ही.डी.एस. योजना/आय.पी.डी.एस. योजना/ ओव्हरलोड ट्रान्‌सफॉर्मर/ नवीन कृषी पंप जोडणी / वाड्या वस्ती विद्युतीकरण योजना). 

दुपारी 1 वाजता जिल्ह्यातल राष्ट्रीय महामार्ग ( राष्ट्रीय महामार्ग विभाग व महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ विभाग) कामकाजाचा आढावा, येडशी - अंबाजोगाई महामार्ग क्र. 52 बीड बायपास अंतार्गत शरिातील 12 कि.मी. च्या व बायपास स्ल‍िप सर्व्ह‍िस रोड बाबत बैठक, लातर - मांजरसुंबा महामार्गातील वाघाळा, ता. अंबाजोगाई येथील उड्डाण पुलाच्या कामकाजाबाबत. दुपारी 2.00 वाजता जलजिवन मिशन कार्याक्रमाच्या प्रगतीबाबत आढावा, दुपारी 3.30 वा. राखीव, दुपारी 4.00 वाजता जिल्ह्यातील आधारभूत केंद्र चालू करणे, कापूस खरेदी केंद्र सुरु करणेबाबत, सायंकाळी 5 वाजता बीड नगर परिषद विविध योजना व विकास कामांचा आढावा आणि सायंकाळी 5 वाजता पंतप्रधन मत्स्य विकास योजना ( जिल्ह्यातील लघु , मध्यम, मोठे, पाटबंधारे प्रकल्प,  को.प. बंधारे व उच्च पातळी बंधारे , सा.त., ल.त., पा.त., गाव तलाव आढावा)
No comments