Breaking News

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सहभागी व्हा : घायतिडक, गटकळ यांचे आवाहन


दिंद्रुड :  माजलगाव तालुक्यातील जिजाऊ ज्ञान मंदिर उमरी बु. व अभिनव पब्लिक स्कूल दिंद्रुड यांच्या संयुक्त विद्यमाने, लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त व स्व. गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन दिंद्रुड येथे २७ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. राज्यभरातुन वक्ते, वकृत्व प्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी व त्यांनी वक्तृत्व क्षेत्राकडे वळावे जेणेकरून भविष्यात पत्रकार, लेखक, राजकीय क्षेत्रात त्यांना उल्लेखनीय कामगिरी करता येईल या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन दि. २७ डिसेंबर २० वार रविवार रोजी दिंद्रुड येथील अभिनव पब्लिक स्कूल येथे करण्यात आले आहे. १५ ते २५ या वयोगटातील विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. तरी पालकांनी व शिक्षकवृंदांनी आपल्या पाल्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे व कार्यक्रमास उपस्थित रहावे असे अवाहन जिजाऊ ज्ञान मंदिर उमरी बु. चे गणेश घायतिडक व अभिनव पब्लिक स्कूल दिंद्रुड चे गणेश गटकळ यांनी केले आहे. 

कोव्हीड -१९चे सर्व नियम पाळून ही स्पर्धा संपन्न होणार आसुन ज्ञानेश्वर महाराज सोळंके मो. 8379878198,गणेश घायतिडक मो. 951199595,गणेश गटकळ 9359111179 या संपर्क क्रमांकावर नोंदणी करुन घ्यावी.

No comments