Breaking News

स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त वडवणीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन


रक्तदान शिबिराच्या दशकपूर्तीस युवाकांनी उपस्थित राहावे : संजय आंधळे

जगदीश गोरे । वडवणी 

गेल्या ९ वर्षापासून वडवणी तालुक्यात अखंडीतपणे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.त्यामुळे तालुक्यातील हजारो गरजुंना रक्ताची मदत लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या  माध्यमातून करण्यात आलेली आहे.

     

कोरोनाच्या महामारीच्या काळात सध्या सर्वत्र रक्तचा तुटवडा निर्माण झाला असल्याने सामाजिक दृष्टीकोनातून रक्तदानांची गरज सर्वञ निर्माण झाली आहे. देशात रक्ताच्या कमतरतेमुळे अनेकांना आपला प्राण गमववा लागला आहे.म्हणुन देशातील कोणत्याही व्यक्तींचा जिव वाचायला हवा या जाणिवेतून वडवणी शहरात केंद्रीय ग्रामविकासमंञी लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त दिनांक ११ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉ.प्रितम मुंडे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्धघाटन करण्यात येणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. केशवराव आंधळे तर रमेश आडसकर व मोहन जगताप,भाजपा जिल्हाध्यक्ष राजेेंद्र मस्के, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निळकंट चाटे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनकर आंधळे, सोमनाथ बडे, बन्सीधर मुंडे, पोपट शेंडगे, मच्छिंद्र झाटे, विश्वनाथ झाटे, राम सावंत,प्रदिप शेळके, श्रीमंत मुंडे यांची विशेष उपस्थित राहणार आहे.या भव्य दशकपूर्ती रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन लोकनेते स्व.गोपिनाथ मुंडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवा नेते संजय आंधळे,अमोल आंधळे यांनी केले आहे.


No comments