Breaking News

सारणी सांगवीत दुचाकीची चोरी


गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील सारणी सांगवी येथून एक मोटार सायकल चोरीस गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात दुचाकी चोराविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 


या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील सारणी सांगवी येथील कैलास युवराज घोळवे वय २२ वर्षे हा युवक वापरीत असलेली व त्याचे वडील युवराज घोळवे यांच्या नावाने नोंदणी असलेली होंडा कंपननीची शाईन काळ्या रंगाची मोटार सायकल क्र. एमएच ४४/आर ६७१५ ही दि. १० डिसेंबर रोजी रात्री घरासमोरून अज्ञात इसमाने चोरून नेली. सदर प्रकरणी कैलास घोळवे याच्या फिर्यादीवरून मोटार सायकल चोरीची केज पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे
No comments