Breaking News

शरद पवार साहेबांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा


मुलांना शालेय साहित्य वाटप, गोरगरिबांना किराणा कीटचे वाटप, गरजूंना ब्लॅंकेट वाटप तर राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा वाढदिवस बीड मध्ये विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शालेय मुलांना शालेय साहित्य तर गोरगरिबांना किराणा सामानाचे किट अर्जुन आबा क्षीरसागर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये आयोजित रक्तदान शिबिरामध्ये शेकडो तरुणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मा.आमदार संदीप क्षीरसागर यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बीड शहरात विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले होते. येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये आयोजित रक्तदान शिबिराचे व विविध कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार सय्यद सलिम, माजी आमदार सुनील धांडे, बजरंग बप्पा सोनवणे ,डी. बी.बागल, हेमंत क्षीरसागर, उषाताई दराडे यांच्यासह पदाधिकारी यांची उपस्थिती होती.  

यावेळी आमदार क्षीरसागर यांचे खंदे समर्थक अजय सुरवसे यांनी शहेंशावली दर्गा येथे चादर चढवली तर श्री समर्थ  हनुमान मंदिरात अभिषेक करुन शरद पवार यांच्यासाठी अभिष्टचिंतन केले. तसेच शिवणी येथे मुलांना शालेय साहित्याचे तर तेलगाव नाका परिसरात गोरगरिबांना किराणा सामानाचे किट तर  थंडीत कुडकुडत असलेल्या रस्त्यावरील बेसहारा व्यक्तींना ब्लँकेटचे अर्जुन आबा क्षीरसागर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी अजय सुरवसे, सुनील महाकुंडे ,ऍड. हजारे, विशाल वाघमारे, निलेश चव्हाण,बाळू चिरके व इतर यांची उपस्थिती होती. 

बेसहारांना मायेची ऊब ..!


काकू- नानांचा वारसा आ. संदीपभैय्या क्षीरसागर कुटूंबीय जपत असल्याची प्रचिती नेहमीच बीडकरांनी अनुभवली असून अडचणीत असलेल्यांना मदतीचा हात देऊन सहकार्य करण्याची परंपरा क्षीरसागर कुटूंबातील आमदार संदीपभैय्यांचे लहान भाऊ अर्जुन क्षीरसागर जपत आहेत. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील तेलगाव नाका परिसरात थंडीत कुडकूडणाऱ्या बेसहारा व्यक्तींना रात्रीच्या वेळी अर्जुन क्षीरसागर यांनी ब्लँकेटचे वाटप करून मायेची ऊब दिल्याने त्या बेसहारा व्यक्तींचे डोळे पानावले होते. अर्जुन क्षीरसागर यांच्या अनोख्या उपक्रमाने आणि आ. संदीपभैय्या क्षीरसागर कुटूंबीय बीडकरांसह बेसहारा व्यक्तींची काळजी वाहत असल्याने बीडकर मात्र भारावून गेले होते.

बीड : किराणा किट वाटप करतांना अर्जुन क्षीरसागर अजय सुरवसे
बीड : शहेंशावली दर्ग्या येथे चादर चढवतांना आमदार संदीप क्षीरसागर यांचे खंदे समर्थक अजय सुरवसे

बीड : शिवणी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करतांना अर्जुन क्षीरसागर यांच्यासह अजय सुरवसे, ऍड. हजारे आदी. 
No comments