Breaking News

कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांना स्वर्गीय कडुबाई गर्कळ साहित्य पुरस्कार जाहीर


                                                         

आष्टी :  येथील तालुका शिक्षण प्रसारक   मंडळ संचलित एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालय,आष्टी. जिल्हा बीड येथील कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांना घोगस पारगाव येथील आई प्रतिष्ठानचा सन 2019..20 चा स्वर्गीय कडूबाई गर्कळ राज्यस्तरीय मराठी साहित्य पुरस्कार जाहीर झाला असून,रुपये 5000,स्मृतिचिन्ह, मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

प्रसिद्ध कादंबरीकार कवी बाळासाहेब गर्कळ यांच्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.डिसेंबर महिना अखेरीस महनिय व्यक्तीच्या हस्ते समारंभपूर्वक हा पुरस्कार दिला जाईल,असे संयोजक बाळासाहेब     गरकळ यांनी कळविले आहे. याआधी  प्रसिद्ध कवी, कादंबरीकार डॉ.कैलास दौंड,संजय घाडगे, ऐश्वर्य पाटेकर, यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून मागील 1918..19  सालचा पुरस्कार अमरावतीच्या प्रसिद्ध कवयत्री सारिका उबाळे यांनाही येत्या सोहळ्यात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. कवी प्रा.सय्यद अलाउद्दीन यांना महाराष्ट्र शासनाचे पाच उत्कृष्ट वांग्मय पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे चा कुसुमाग्रज पुरस्कार, अंकुर साहित्य पुरस्कार, स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार, यशराज पुरस्कार, जगदीश खेबुडकर पुरस्कार,  शब्दअंगार पुरस्कार, गदिमा शब्द सृष्टी सन्मान पुरस्कार,सुरेश कुलकर्णी पुरस्कार, शब्दरंजन पुरस्कार, शांता शेळके पुरस्कार,शिव छत्रपती साहित्य पुरस्कार, स्वामी विवेकानंद साहित्य पुरस्कार, नरेंद्र मुनी स्मृति पुरस्कार,शब्दगंध साहित्य पुरस्कार, रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार,मिस्कीन शहा बाबा सुफि पुरस्कार, आरती प्रभू पारितोषिक,गो .नी. दांडेकर पारितोषिक,वा.रा.कांत पारितोषिक,गंगाई- बाबाजी पुरस्कार, शब्दांगण पुरस्कार आदि पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यांची एकूण पंधरा पुस्तके प्रकाशित आहेत.आई प्रतिष्ठानच्या सदर पुरस्काराबद्दल संस्थाअध्यक्ष किशोर नाना हंबर्डे, सचिव अतुल शेठ मेहेर, दिलीप सेठ वर्धमाने, प्राचार्य डॉ. सोपानराव निंबोरे, सर्व पत्रकार,यांनी कवी प्रा.सय्यद अलाऊद्दीन यांचे अभिनंदन केले आहे.


No comments