Breaking News

भारत बंदला दिंद्रुडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


बाबासाहेब देशमाने । दिंद्रुड

शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात सुरू असलेला संघर्ष आता निर्णायक वळण घेत आहे. दिल्ली येथे संपन्न झालेल्या शेतकरी संघटनांच्या बैठकीत शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी 8 डिसेंबर रोजी भारत बंद ची हाक देण्यात आली होती. या बंदमध्ये सहभागी होत दिंद्रुडकरांनी कडकडीत बंद पळून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला.

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांना रोखण्यासाठी सुरू असलेल्या दिल्ली येथील अन्नदाता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलनामध्ये शहीद झालेल्या आंदोलनकारी शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. हे आंदोलन मा क प किसान सभेचे कॉ. सुहास झोडगे, राष्ट्रवादीचे अखिल सय्यद, आर पी आय चे बाबा देशमाने, महात्मा फुले समता परिषदेचे राजेभाऊ कटारे, डीपीअाय चे नवनाथ कांबळे, भीम आर्मी चे सिद्धार्थ मांदळे,  शिवसेने चे लक्ष्मण सोळंके, संभाजी ब्रिगेड चे किशोर ठोंबरे, प्रा.श्रीहरी काळे, बजरंग दळवे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी आंदोलनामध्ये नितीन झोडगे, कृष्णा शिनगारे, गणेश शिनगारे, दत्ता शेळके, दत्ता पवार, राज झोडगे यांच्यासह परिसरातील असंख्य शेतकरी, कामगार, विद्यार्थी, युवक, सहभागी झाले होते.No comments